ताव म्हणजे ताप, उष्णता. गुजरातीत तापाला (ज्वर)म्हणतात. पण अर्थात मराठीत 'ताव' चे आणखीही अर्थ आहेत. एखाद्या खाद्यावर ताव मारला म्हणजे ते खाद्य चापून खाल्ले. तवणे म्हणजे (उष्णतेने) वितळणे. तावून-सुलाखून म्हणजे सुलाखेसारखे (शलाका, सळी, गज ) अग्नीत झळझळून. उष्णतादर्शक अर्थ घ्यायचा तर चे. पं. यांचा हीटेडली योग्य वाटतो. चेव या अर्थाने मि. फ. यांचा फ़्रेंझीड योग्य वाटतो.