अटलांटापासून जसे इंग्रजीत अटलांटिक होते तसे वेदपासून वेदिक. हे इंग्रजीपुरते ठीक आहे, संस्कृतमध्ये वैदिकच म्हटले पाहिजे,  विकीवर कदाचित 'वेदिक' रुळले असले तरी! 
वैदिकचा 'वेद पढलेला ब्राह्मण' हा एकच अर्थ नाही. त्याचे वेदासंबंधी, वेदापासून मिळालेले, वेदामध्ये सांगितलेले, वेदानुकूल, वेदसंमत,  वेदाने सुचविलेले वगैरे विविध अर्थ संभवतात. त्यामुळे वैदिक शब्द बाद व्हायचे कारण नाही.
मराठीत अर्धवार्षिक, द्वैवार्षिक,  त्रैमासिक, द्विसाप्ताहिक अशी विविध रूपे, त्यांतली काही चुकीची असली तरी वापरली जातात. संस्कृतमध्ये मात्र आर्द्धमासिक हे रूपच शुद्ध मानले जाते. या अनुसार आर्ग्वेदिक (ग्वे!) हा शब्द बनायला हरकत नाही. असे असले तरी, कात्यायनाच्या सौरसूत्रावरील टीकाग्रंथात आर्ग्वैदिक (ग्वै! ) हा शब्द 'ऋग्वेदात समाविष्ट' (बिलॉङ्‌गिंग टु ऋग्वेद) या अर्थाने आला आहे, असे शब्दकोश सांगतो.