छान माहिती, खूप धन्यवाद !! तावचा ताप, उष्णता हा अर्थ माहीत नव्हता / विस्मृतित गेला होता. लहानपणी गुजराथी मित्रांच्या तोंडी ताप या अर्थी 
तावब्द ऐकल्याचे ता आठवले. तावून-सुलाखून चा शब्दशः अर्थ देखील पहील्यांदाच समजला. तवणे हा श्ब्द तर नव्यानेच कळला. मिशीवर देखील ताव मारतात याची आठवण करून द्याविशी वाटते. 

पण 'तावातावाने बोलण्या 'संबंधात - एखादा तावातावाने बोलतो असे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे दृश्य येते किंवा मनात जो भाव येतो तो ''डिस्कसिंग हीटेडली' असे म्हटल्यावर येत नाही असे मला वाटते. हा कदाचीत माझा गैरसमजही असू शकेल, पण ते मिदान माझ्या पुरते तरी खरे आहे. फ्रेंझीड ची तऱ्हा तर आणखीनच निराळी. शब्दशः भाषांतर नेहेमीच शक्य होत नाही याचेच हे एक उदाहरण मानायला हरकत नाही.