मूळ लेख वाचल्याशिवाय प्रतिक्रिया देणे कठीण आहे.
तरीही बहुतेक भारतीय भाषा संस्कृत-जन्य आहेत असे म्हणायला हरकत नसावी. एक तर सर्व भाषांचे व्याकरण संस्कृतसारखेच आहे. शिवाय बहुसंख्य शब्द संस्कृतमधून आलेले आहेत. अर्थात इतरही काही अ-संस्कृत शब्द देखील मराठीत आहेत (तत्सम शब्द). पण अशा शब्दांची संख्या कमी आहे.
देव-भाषा : अंस्कृत आर्यांनी भारतात आणली. अर्यांच्याच ग्रंथांमध्ये बहुतेक तिचा देव-भाषा असा उल्लेख आहे. तेव्हा आर्यांना देव-समान असलेल्या एखाद्या संस्कृतीतून ती भाषा आली असू शकेल. या पलीकडे आपण या विधानाच्या सत्यासत्यते विषयी काय तर्क बांधणार?
शुद्ध भाषा - सर्वात शुद्ध भाषा या विधानाला काय अर्थ आहे? सर्वात शुद्ध भाषा कोणती? थोडक्यात हे विधानच सदोष वाटते.
संगणका साठीची अनुकूलता - कोणत्या आधारावर संस्कृत सर्वात अनुकूल नाही असे म्हटले आहे ?