तवका (पुं) ह्या शब्दाचे मूळ शब्दरत्नाकरात अरबी  असे दिलेले असून त्याचा अर्थ शक्ति, जोर, बळ असा दिलेला आहे. याशिवाय तवक, तवंक, तवका, तवंकु हे शब्द प्राकृत गणले असून त्यांचा अर्थ 'त्वेष, आवेश' असा सांगितला आहे. ' आवेश' साठी  इंफ्लुअन्स, प्रभाव, जोर, अँगर, पॅशन, ऍजिटेशन (क्रोध, क्षोभ, बलवान मनोविकार) असे शब्द देवस्थळी-जोशी-कुलकर्णी संस्कृत-इं-म-गुज. शब्दकोशात दिलेले आहेत.