तांत्रिक अंगाचा मुद्दा तेवढासा योग्य वाटत नाही. गुगल काय, तुम्ही जे द्याल ते शोधणार. तुम्ही संत दिलं तर संत, सन्त  दिलात तर सन्त. संगणकाला काहीच फरक पडत नाही, या सर्च टर्म्सच अक्षरांच्या दृष्तीने वेगळ्या आहेत. पण मूळात हा एक शब्द सन्त आणि संत या दोन्ही प्रकारे लिहीला जावा, हेच थोडे गोंधळाचे आहे.

प्रचलित अनुस्वार हा मूळातच थोडा वादाचा विषय आहे. मराठीत आपण अंग, मंच, गंड, दंत आणि संप, हे सर्वच शब्द अनुस्वाराचा उपयोग करून  लिहितो. इतर काही भारतीय भाषांमध्ये (उदा. बंगाली) असे शब्द वर्गीय आनुनासिक व्यंजनाला जोडून (वर आपण दाखवल्याप्रमाणे) लिहिले जातात. त्यामुळे मराठीत देहांत आणि देहान्त सारख्या समस्या येतात. 
( प्रत्य्क्षात  बोली मराठीत - बहुतांशी - हा गोधळ होत नाही, कारण देहांमध्ये या अर्थी देहांत म्हणताना आपण शेवटच्या त चा उचार पूर्ण करत नाही, तर देहान्त मध्ये हा उच्चार पूर्ण केला जातो. पण लिखित मराठीत हा फरक दिसत नाही. )

मूळात अनुस्वार हा स्वर आणि व्यंजन दोन्हींचे काम करतो हेच गोंधळाचे आहे. पुन्हा एकदा, देहांत आणि देहान्त - जरी त चा उच्चार दोन्ही शब्दात पूर्णच केला, तरीही देहांत आणि देहान्त मधील आनुनासिक उच्चार हे खूपच वेगळे आहेत. त्यामुळे या दृष्ट्या विचार करता हे दोन्ही शब्द एकाच प्रकारे लिहीणे हे आपण म्हटल्याप्रमाणे समर्थनीय नाहीच. पण दुसऱ्या बाजूने विचार केला, तर देहांत  सारखे आनुनासिक उच्चार प्रचलित मराठीत किती आहेत?  फारच थोडे. त्यामूळे व्यावहारिक दृष्टीने विचार करता, आनुनासिक व्यंजनांऐवजी अनुस्वार ही एक 'कन्व्हिनियंट तडजोड' होऊ शकते, कारण त्यातून अर्थाचा गोंधळ होण्याची शक्यता फार थोडी  किंवा जवळपास नाहीच. 

शासकीय 'शुद्ध लेखनाचा' निर्णयही कदाचीत याच 'व्यावहारिक दृष्टीकोनातून' झाला असेल. पण शासकीय निर्देश तसेही फक्त शासकीय भाषेपुरतेच मर्यादित राहतात, इतरत्र त्याचा अंमल होतोच असे नाही, त्यामूळे त्याची तेवढी चिंता करण्याचे फारसे कारण नाही.