मनोगताच्या कळफलकाचा असा नकाशा कुठे उपलब्ध आहे का?

मनोगताची लिप्यंतरसुविधा ही कळफलकाचे मराठीकरण नव्हे, किंवा तो मराठी कळफलकही नव्हे.

मिळणाऱ्या गोष्टींतून कसे कसे मराठी साधता येईल हा विचार आणि आपल्याला हवे तसे मराठी लिहिण्यासाठी कोठल्या गोष्टींमध्ये काय काय बदल करून घ्यावे लागतील हा विचार ... ह्या दोहोंच्या दिशांत फरक आहे.

बाजारात मिळणाऱ्या कळफलकावरच्या कोठकोठल्या कळी दाबल्यावर कोठकोठली मराठी अक्षरे उमटतील असा विचार मनोगताच्या लिप्यंतरसुविधेत नाही. एकेक मराठी अक्षर उमटवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या कळफलकावरच्या कोठकोठल्या कळी कोठल्या क्रमाने वापरायला लागतील त्याचा विचार करून लिप्यंतरसुविधा बनवलेली आहे. हे करताना एखादे मराठी अक्षर उमटवण्यासाठी एकापेक्षा अधिक कळी काही ठराविक क्रमाने वापराव्या लागतात. किंवा एखादे मराठी अक्षर अनेक प्रकारे उमटवता येते.

ह्या बाबी वरीलप्रकारे 'कळफलकाचे नकाशे' बनवताना साधता येत नाहीत, असे वाटते.

कळावे.