संत हा शब्द फक्त अनुस्वारयुक्त लिहिणे जरुरीचे आहे. तो सन्त्त असा लिहू नये हा मराठी शुद्धलेखनाचा नियम एका परीने योग्य आहे.  त्याउलट हिंदी किंवा संस्कृतमध्ये सन्त्त असेच लिहिले जाते.  या भाषांच्या शब्दांचा शब्दकोशांतील अनुक्रम बहुधा या लिखाणपद्धतीला अनुसरून असतो. जर संत हा शब्द दोन प्रकारे लिहिण्याचा प्रघात  पडला तर शब्दकोशात हा दोन वेळा, दोन ठिकाणी येईल.  असे होणे अनुचित आहे.

हंस, संसार हे शब्द अनुस्वारयुक्त लिहितात, पण हन्स‌, सन्सा‌र असे उच्चारतात, संस्कृतमध्ये बहुधा तसे नसावे; मराठीत तर नाहीच नाही.

सन्‌त असे लिहिणे सर्वतोपरी अशुद्ध आहे. या शब्दातील 'न'चा पाय मोडण्यासाठी आपण जी खूण करतो त्या खुणेला मराठी सोडून संस्कृतसकट अनेक भारतीय भाषांत विरामचिन्ह म्हणतात. याचा  अर्थ असा की हे चिन्ह जोडलेल्या अक्षराच्या उच्चारणानंतर क्षणभर विराम (पॉज़) घेऊन पुढचे अक्षर उच्चारावे.  बालोद्यान आणि बालोद् यान यांचे अर्थ समान नाहीत.

टिळकांनी संत हा शब्द तीन प्रकारे लिहिला तेव्हा ते प्राथमिक शाळेत होते आणि त्यांचे शिक्षकही प्राथमिकशाळायोग्य होते. टिळकांचे त्यावेळी जसे कौतुक झाले तसे मोठेपणी झाले नसते.