मराठी भाषकांना अमराठी विशेष नामांचा परिचय बहुतांशी इंग्रजी भाषेद्वारे झाला. त्यामुळे ताता, बिड़‌ला, मुरारजी, उड़िशा, रुड़की, खंड़वा, वगैरे नावे आपण टाटा. बिर्ला, मोरारजी, ओरिसा, रुरकी, खांडवा अशी उच्चारतो आणि लिहितोही. त्यामुळे गुजराथीत ' ताता' लिहितात आणि आपण टाटा म्हणतो यात आश्चर्य नाही.