दोन्ही शब्दात न अर्धा आहे. फक्त नोटेशनचा फरक आहे. पहिल्या शब्दात तो पाय मोडून दाल्हवला अहे, तर दुसयात न  हे अक्षर अर्धे काढून दाखवला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारे लिहीणे योग्य  आहे असे वाटते. पण सन्त लिहीणे जास्त सोपे आहे, आणि कदाचीत त्यामुळेच हीच पद्धत जास्त प्रचलित आहे एवढेच. सर्व शुद्ध व्यंजनेदेखील पाय मोडूनच दाखवली जातात. त्यात अ हा स्वर जोडूनच पूर्ण अक्षर तयार होते. जोडक्षरातही पहीले अक्षर शुद्ध व्यंजन असते, आणि शेवटच्या अक्षरापुढे स्वर जोडला जातो. त्यामुळे सुरुवातीचे अक्षर पाय मोडून दाखवण्यात काहीच आक्षेप्पर्ह वाटत नाही. 

वरील बालोद् यान या शब्दात यान च्या आधी मोकळी जागा आहे, अर्थात हे दोन वेगळे शब्द आहेत असे दिसते. त्यामुळे त्याचा अर्थ वेगळा असणे स्वभाविक आहे.