कथा नाही पण भाषांतर आवडले.
 
क्रिस्टी ह्या माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक असल्या तरी मला त्यांच्या कथांपेक्षा कादंबऱ्याच पसंत आहेत.  कथा हा प्रकार त्यांच्या लेखनशैलीस तितका अनुकूल नाही असे माझे मत आहे. वाचकाला सारे महत्त्वाचे दुवे पुरवूनही त्याला गुंगवून त्याची दिशाभूल करण्याच्या त्यांच्या शैलीला लागणारा पैस कथेच्या  मर्यादेत त्यांना मिळत नाही.