'बालोद्‌यान' हा शब्द  असा जोडून लिहिला तरी त्याचा उच्चार बालोद्यान असा होणार नाही. ज्या अक्षरानंतर विरामचिन्ह येते  ते अक्षर उच्चारल्यानंतर यती घेणे सक्तीचे आहे.  सन्‌त या शब्दाचा उच्चार संत असा होऊच शकत नाही.  त्यामुळे साधू किंवा सज्जन अशा अर्थाने सन्‌त लिहिणे सर्वथा चुकीचे आहे.