वरील लिखाणातील  तसेच इतर प्रतिसादातील मुद्दे पटण्यासारखे आहेत, पण पुन्हा काही शंका उद्भवतात. 

्   - हे चिन्ह (अल्प)विराम चिन्ह दर्शवते असा मुद्दा आहे. वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे हे पटते. पण सर्वच ठिकाणी ते तसेच आहे का या बाबत शंका आहे. 

१)  शुद्ध व्यंजने - स्वररहित  व्यंजने ही फक्त पाय मोडल्याच्या चिन्हानेच दर्शवली जातात. त्याला दुसरी पद्धत नाही. पण तेथे ते विरामचिन्ह नसते.  उदा. - सत् या शब्दात त् हे शुद्ध व्यंजन आहे, येथे विरामचिन्हाचा प्रश्न नाही. 
२) वर सन्टॅन चे जे उदाहरण  दिले आहे, त्या बद्दल - इंग्लिशमध्ये सिलॅबल हा कन्सेप्ट  आहे, जो मराठीत अजिबात नाही. वरील शब्दात सन् पहिले सिलॅबल आहे, आणि टॅन् हे दुसरे (न देखील अर्धा आहे ह्याची नोंद घ्यावी). प्रत्येक सिलॅबल नंतर ब्रेक असतो, त्यामुले हे शब्द तसेच उच्चारले जाणार. हे शब्द मराठीत ट्रान्स्क्रिप्ट करताना वापरले जाणाऱ्या नोटेशनची तुलना येथे करणे योग्य नाही. 
३) मराठीतही खरतर  सिलॅबल्स आहेतच. पण आपण ती दर्शवत नाही. पटकन ह शब्द  उच्चाराप्रमाणे खरतर पट्-कन् असा असायला हवा होता, पण तसा तो दाखवण्याची पद्धत नाही. 

तेव्हा शेवटी मुद्दा हा आहे, की - 
अ) प्रत्येक ठिकाणी अल्पविराम हा ् या चिन्हाने दर्शवला जातोच असे नाही, आणि
ब) प्रत्येक ठिकाणी ् हे चिन्ह अल्पविरामच दाखवते असे नाही, काही ठिकाणी ते फक्त शुद्ध व्यंजन दाखवते. 
हा माझ्या दृष्टिकोनातून मी लावलेला अन्वयार्थ आहे, हे नमुद करायला हवे. 

त्यामुळे जर वरील ब) हा मुद्दा मान्य केला, तर जोडक्षरातील पहिले अक्षर हे शुद्ध (स्वररहित) व्यंजन असते, जे पाय मोडून दाखवणे समर्थनीय आहे, आणि म्हणूनच ( माझ्या मते ), सन्त = सन्‌त !! 

(एका दृष्टीने ही सर्व फुकाची किंवा ऍकॅडमिक चर्चा आहे, कारण शेवटी कोणत्याही प्रकारे लिहिल तरी वाचणाऱ्याला काही  अडचण  येत नाही किंवा गोंधळ होत नाही, आणि त्या दृष्टीकोनातून, ही पक्त "प्युरिस्टांची" चर्चा आहे. )