अ) प्रत्येक ठिकाणी अल्पविराम हा ् या चिन्हाने दर्शवला जातोच असे नाही, आणि
ब) प्रत्येक ठिकाणी ् हे चिन्ह अल्पविरामच दाखवते असे नाही, काही ठिकाणी ते फक्त शुद्ध व्यंजन दाखवते.


अ) कमीजास्त मापाचा अल्पविराम दाखविण्यासाठी स्वल्पविराम, अर्धविराम, दंड, पूर्णविराम आणि डॅश/हायफन ही विरामचिन्हे आहेतच.  त्यामुळे  ् या चिन्हानेच अल्पविराम दाखवला पाहिजे असे नाही. पण जेव्हा जेव्हा ् हे चिन्ह दिसेल तेव्हा तेव्हा किंचित थांबून पुढचे अक्षर (असल्यास) उच्चारायला पाहिजे.
ब)  जेव्हा  पाय मोडायचे 'विराम'चिन्ह  हे शुद्ध व्यंजन दाखवते, तेव्हा त्या उच्चारानंतर आपोआपच विराम येतो.

संस्कृत कोशामधल्या विराम या शब्दाचा अर्थ येथे वाचावा.

(एका दृष्टीने ही सर्व फुकाची किंवा ऍकॅडमिक चर्चा आहे, कारण शेवटी कोणत्याही प्रकारे लिहिल तरी वाचणाऱ्याला काही  अडचण  येत नाही किंवा गोंधळ होत नाही)

हे मात्र अमान्य. पूर्वी महाराष्ट्रातल्या शालेय पाठ्यपुस्तकांत द्वंद्व हा शब्द टंकलेखन यंत्राच्या सोयीसाठी, द्‌‌वंद्‌‌व  असा आणि असाच लिहिला जाई, तेव्हा शुद्धलेखनतज्ज्ञांनी आणि विशेषतः कै. सत्त्वशीला सामंत यांनी प्रचंड गदारोळ केला होता, हे कसे विसरता येईल?  द्‌‌वंद्‌‌व हा शब्द वाचताना अडचण येतेच.