मराठीला अतिशय समृद्ध असे कोशसाहित्य लाभले आहे. शब्दकोशाव्यतिरिक्त शेती, पक्षी,व्यवहार,म्हणी, ज्ञानेश्वरीतील शब्दभांडार, फेल्ड हाउस-तुळपुळे यांचा यादवकालीन मराठी असे अनेक कोश आहेत. कीर्तिमहाविद्यालयात एक अखखा विभाग कोशांचा आहे. कृ. पां. कु. यांचा श्रीपाद जोशी यांनी अद्ययावत केलेला व्युत्पत्तिकोश मला उपयुक्त वाटतो. मराठीसाहित्य महामंडळ किंवा तत्सम नामधारक संस्थेने संपादित केलेल्या मराठी शब्दकोशाचे सर्व खंड इतर सर्व शब्दकोशांत मला उजवे वाटले. पारल्याचे लोकमान्य ग्रंथालय, चरनी रोड इथले ग्रंथालय इथे हे सर्व खंड मी पाहिलेले आहेत.
पॉप्यूलर प्रकाशनाची मराठी लेखक सूची आणि परिचय एक चांगला प्रयत्न आहे.
संस्कृत-इंग्रजी-मराठी-गुजराती असा एक कोश मजजवळ आहे. त्यावर 'स्टुडंटस डिक्शनरी' असा जरी उल्लेख असला तरी हा कोश बऱ्यापैकी समावेशक आहे.