संटॅनचा उच्चार सण्टॅन असा होईल हे खरे, पण मराठीत अनेकदा पँट, अँड, पंच (=ठोसा), बंच, वाँटेड वगैरे शब्द उच्चाराचा विचार न करता चुकीचे लिहिले जातातच.  तसाच संटॅन.

सन्‌‌टॅन असेच लिहिले पाहिजे असेही नाही.  सनटॅन लिहिले तरी मराठीत तोच उच्चार होईल.  संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे न आलेल्या, म्हणजे तत्सम नसलेल्या चार किंवा अधिक अक्षरी मराठी शब्दांत दुसरे अक्षर अकारान्त असेल तर त्याचा उच्चार बहुधा हलन्त होतो.  उदा० बाय्‌‌कोने, काट्‌‌कसर, पळ्‌‌पुटा,  पाण्‌‌बुडीने, वगैरे.  तसेच सनटॅन (उच्चार सन्‌‌टॅन).

काहीवेळा पाय न मोडता लिहिणे उचित समजले जाते.  उदा० फॉरमायका, नॉरदॅम्प्टन,  कॅलक्युलस, वगैरे शब्द लिहिताना त्यांतील दुसऱ्या अक्षराचा पाय मोडायचा प्रघात नाही.  --- अद्वैतुल्लाखान