कथा नाही पण भाषांतर आवडले
असेच म्हणतो.
होम्स वाचण्याचा दुष्परिणाम असा की प्रत्येक लेखकाची, लेखनाची तुलना नकळत होम्सकथांशी होत राहाते. (निदान माझे तरी तसे होते. ) अगाथा क्रिस्टीबाबत माझे नेमके हेच झाले आहे. नॉट दॅट आय लाईक सीझर लेस, बट दॅट आय लाईक रोम मोअर.
पण भाषांतर आवडले. भाषांतर म्हणजे, एक जुनी उपमा वापरायची तर, एका कुपीतले अत्तर सांडू न देता दुसऱ्या कुपीत ओतणे. मीराताईंनी हे छान केले आहे. मुळात अत्तराची आवड प्रत्येकाची वेगवेगळी असते, तो भाग वेगळा.