अहो कसलं पीडन आणि कसल्या भावना चाळवताय!!
दुसऱ्याला वेदना देऊन आनंद मानणाऱ्यावर लेख कसले लिहिता.
(मला एक वाक्य आठवलं, पु लं च्या पुस्तकातलं....
"तुमच्यात कविता करत्यात, आमच्यात खून करत्यात.....)
असलं काही आवडणारे "मनोगत" वर तर नाहियेत.
तेव्हा, असलं काहीतरी लिहिण्यापेक्षा सत्यघटनेवर काहीतरी वाचा फोडणारं लिहा ना.
हे काय विकृत. उगीच आपलं पेन आहे, कल्पना आहे, म्हणून काहीही.....
तुमच्याकडे लेखनप्रतिभा आहे तिचा "सदुपयोग" करा ना? हे काय हे खुळ्यासारखं!!
टीव्हीच्या मालिका आणि हे लेखन ह्यात मग काय फरक राहिला.
........................ वैयक्तिक घेऊ नका. पण हा लेख अत्यंत विकृत आहे. असंही वाटू शकतं की लेखकालाही हे असलं सारं आवडत असावं.
प्रशासकांनी हा लेख "प्रकाशित करण्यास योग्य" कसा ठरविला देव जाणे.........
असो.
पुन्हा सांगतो....... प्रतिभेचा असा वापर नका हो करू. आम्ही कदाचित एका चांगल्या लेखकाला मुकू.

                                                                                                                                 ..............................कृष्णकुमार द. जोशी