आता मराठी विनोद सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हायला हवा. आपण अजून पु. ल.,  चिं. वि.  जोशी, मिरासदार यांच्या पलीकडे जातच नाही

पूर्वी मी असा एक प्रयोग करून पाहिला होता. तुम्ही असे विनोद लिहायचा प्रयत्न करायला हरकत नाही असे सुचवावेसे वाटते. एखादे 'हास्यक' घेऊन ते मराठी वातावरणात गुंफून छान हास्यकथा सादर करता येतील असे वाटते.

(विनोदाच्या गाभ्याला 'हास्यक' हा शब्द न. चिं. केळकरांनी वापरलेला आहे असे अत्र्यांनी लिहिलेल्या हास्यकथांच्या प्रस्तावनेत वाचायला मिळाले. )