शिवाय एवढ्या वर्षांनंतरही शासनाचे फक्त दोनच खंड झाले असतील, तर बाकीचे कधी पूर्ण होणार, हादेखील प्रश्नच आहे. तरी हा खुलासा रावा, आणि उपलब्ध असल्यास दुवे पुरवावेत.

फक्त दोन खंड आंतरजालावर सापडले, बाकीचे नाही.  एकूण पाच खंड प्रकाशित झाले आहेत, आणि सहाव्या पुरवणी कोशाचे काम चालू होते, तेवढ्यात कोशाचे मुख्य संपादक प्राचार्य रामदास डांगे यांचे  १० दिवसांपूर्वी म्हणजे २ जुलैला निधन झाले. त्यांच्या कार्यालयात व्यु‌‌त्पत्ती कोशाचे काम अजूनही चालत असावे. सुप्रिया महाजन या, त्या व्युत्पत्तिकोशाच्या कार्यकारी संपादिका आहेत.

कै. सत्त्वशीला सामंत यांच्या 'शब्दानंद' नामक व्यवहारकोशाच्या शेवटी मराठी- हिंदी आणि इंग्रजी शब्दसूच्या आहेत. या सूच्या अनुक्रमे अकारविल्हे आणि अल्फाबेटिकली रचल्या असल्याने कोश वापरण्यास कोणतीही अडचण भासत नाही. हा कोश म्हणजे, यापूर्वी महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या अनेक तांत्रिक कोशांचे जणू काही एकत्रीकरण आहे. कोशाचे प्रकाशन डायमंड पब्लिकेशनचे आहे.  हा कोश खरोखरीच अजोड आहे.