Bohunkus (भंकस) हा शब्द पी.जी. वुडहाऊसने त्याच्या जीव्ह्ज़ इन द ऑफ़िंग या पुस्तकात पाचव्या प्रकरणात वापरला आहे. अर्थ : हॅमरहेड; मूर्ख माणूस. हा शब्द त्यानंतर कोणीही वापरलेला नसावा.
इंग्रजीत Buncum/Bunkum (बंकम) असा एक शब्द आहे, तो Buncombe या ग्रामनामावरून आला. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना प्रांतातील या नावाच्या गावाहून आलेल्या प्रतिनिधीने इ. १८२०च्या सुमारास भरलेल्या १६व्या काँग्रेसमध्ये एक अर्थहीन म्हणजेच भंकस भाषण केले होते. त्यावरून, (१) इनसिन्सिअर भाषण, क्लॅपट्रॅप,हमबग.
(२) एखाद्या राजकीय पुढाऱ्याने केलेले गांभीर्य नसलेले उथळ भाषण
अशा अर्थांनी बंकम हा शब्द वापरला जातो.
संदर्भ : डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.युवरडिक्शनरी.कॉम/हॅमरहेड