मला वाटते विविध विषयांवर साहित्यनिर्मिती होवू शकते. विकृतीवर होवू नये असं काही नाहीये ना. विश्वकोषावर या विषयाची संक्षिप्त माहिती आहे, ती तुम्ही पाहू शकता. विश्वकोष दुवा
"असलं काही आवडणारे "मनोगत" वर तर नाहियेत."
हे तुम्ही खात्रीने कसं सांगू शकता ? तुम्हाला सगळ्या सदस्यांच्या सगळ्या अगदी सुप्त आवडी निवडी देखील ज्ञात आहेत का ?
"असंही वाटू शकतं की लेखकालाही हे असलं सारं आवडत असावं."
आवडंत असावं का ? आवडतंच की... आणि ते सांगण्यात संकोच वाटावा असंही काही नाहीये. तसेच आपल्याला आवडणाऱ्या विषयाकरिता प्रतिभा खर्ची करणेही साहजिकच आहे ना.
मी लिहलेली "समर्पण-एक प्रेमकथा" आपण वाचू शकता.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.