माननीय लेखक, मराठी कथालेखक,
मला काही सर्व मनोगतींच्या सुप्त आवडी-निवडींची माहिती नाही पण तुम्ही २५-३० दिवसांपूर्वी टाकलेल्या ह्या कथेला अजूनतागायत एकही, उत्तम लेखन, छान वाटलं, अश्याच छान छान कथा टाकत जा बुवा, वगैरे तत्सम  पोस्ट नाही म्हणून मला असं म्हणावसं वाटलं.म्हणून मग.............


.................आणि ते सांगण्यात संकोच वाटावा असंही काही नाहीये. तसेच आपल्याला आवडणार्‍या विषयाकरिता प्रतिभा खर्ची करणेही
साहजिकच आहे ना.


१. वस्तुतः मला असं म्हणायचं होतं----- "असंही वाटू शकतं की लेखकाचा स्वभावही असाच असू शकतो. आणि अश्या वृत्तीला त्याचा दुजोरा आहे. "
कथेत एखादं पात्र त्या वृत्तीचं असणं वेगळं पण पूर्ण कथाच त्या वृत्तीभोवती फिरत असेल तर ती भावणं कठीणच.
२. मी कुठे म्हणतोय प्रतिभा खर्ची करू नका म्हणून आणि असंतरी कुठे म्हणतोय की जरा संकोच बाळगा म्हणून....

मला इतकंच म्हणायचं आहे,
तुमच्याकडे लेखनप्रतिभा आहे तिचा "सदुपयोग" करा. तुम्ही चांगलं लिहू शकता आणि चांगल्या पद्धतीने लिहू शकता मग उगीच विकृत आणि बीभत्स कशाला लिहायचं? म्हणजे अभिनव बिंद्रा किंवा राजवर्धननं खून करत सुटल्यासारखं झालं. नाही का. हे खून करणं "काहींना"  आवडतही असेल म्हणून काय मग त्यांनी खून करतच सुटायचं?
होय की नी?