शृंगार - अश्लीलता यामधली सीमारेषा धूसर आहे. त्यामुळे फडके - पाध्येच काय अगदी काकोडकर - दळवींचे (पेंडश्यांच्या "रथचक्र" मधील काही पाने) लेखन विकृत म्हणता येणार नाही. अपवाद, काकोडकरांच्या शामा कादंबरीचा ज्यात स्त्रियांच्या समलिंगी संबंधांचे चित्रण आहे (असे वाचले आहे, प्रत्यक्ष कादंबरी वाचलेली नाही). पेंडश्यांची "आकांत" कादंबरी पुरुषांमधल्या समलिंगी संबंधांबद्दल असली तरी त्यात कसलेही "चित्रण" नाही. विषय सूचकतेने हाताळला आहे.
ज्या पद्धतीने लेखकाने ही कथा "रंगवली" आहे त्यावरून मला तरी हा प्रकार विकृत वाटतो.
विनायक