१) आत्मा ही एक कल्पना आहे. आत्म्याचे अस्तित्व कधीही, कोठेही सिद्ध झालेले नाही.
२) पुनर्जन्म, चैतन्य याही केवळ कल्पना आहेत. त्यांना कोणताही पुरावा नाही.
३)मृतात्म्याचे जे कर्म भोग त्याला बरोबर नेता येत नाहीत . तेआजूबाजूचा समाज भोगतो. तो सुद्धा कसा, की ज्यांचे विचार चांगले 
त्यांच्या वाट्याला चांगले भोग येतात आणि वाईट भोग अर्थातच वाईट विचारअसणाऱ्यांच्या वाट्याला येतात. म्हणून विचार करताना चांगले 
विचार करावेत कारण जगात चांगले विचार फिरत असतात. तीच परिस्थिती वाईटविचारांची आहे. असे फिरणारे बेवारशी विचार त्या त्या 
विचाराकडे ओढले जात असावेत.  
'सनातन प्रभात' सारख्या प्रकाशनात हे वाक्य ठीक आहे. एरवी अर्थशून्य आहे.
४) चांगले आणि वाईट या सापेक्ष कल्पना आहेत. चांगले आणि सकारात्मक (म्हणजे मराठीत पॉझिटिव्ह) या भिन्न कल्पना आहेत.
५) संतंच्या चांगल्या कर्माचे फळ त्यांच्या सहवासात येणाऱ्या चांगल्या लोकांना मिळते आणि वाईट वाईटांना.
आता यावर काय लिहिणार कपाळ! आपण कितीही चांगले असलो तरी आपल्या सहवासात येणाऱ्या संतांनी चांगले कर्म केलेच नसेल( आणि तर मग ते संत कसे? ) तर आपल्याला काही फळ मिळणार नाही.
 आणि आपण वाईट असलो आणि आपल्या सहवासात येणाऱ्या संतांनी वाईट चांगले कर्म केले असेल( आणि तर मगते संत कसे? ) तर मग आपण संपलोच.
असे बरेच तंतू काढता येतील. पण तसे करणे हे चांगले कर्म आहे की वाईट याबाबत शंका असल्याने लेखनसीमा.