प्रश्न वाचल्याबरोबर मला एक गोष्ट माझ्या स्मृतीकोशातून पुढे आली.
साधारण आठवते ते असेः
आज का अर्जुन या चित्रपटात अमरीश पुरी सरावाप्रमाणे अत्याचारी, ग्रामस्थांवर अन्याय करणारा असतो. त्याचा मुलगा त्याच्याहून वाईट असतो. अमिताभ हा गावातील एक सज्जन 'तरुण' असतो. अमिताभला त्रास देण्याच्या हेतूने मुलगा अमिताभच्या बहिणीशी लग्न करतो. तिला दिवस जातात. दिवस गेल्यावर तो मुलगा तिला वाऱ्यावर सोडून देतो. यथावकाश बहीण बाळंत होते. तिचा मुलगा पाच- सात वर्षांचा होतो. बहीण मृत्यू पावते. चित्रपटाच्या अखेरीस मुलगा व त्याचा बाप अमरीश पुरी दोघेही अमिताभकरवी मारले जातात. पुरीने शेवटचा श्वास घेण्याआधी अमिताभ सांगतो, " "ठाकूर, तुम्हारा अग्निसंस्कार मेरे भांजेके हाथोंही होगा. वैसेभी दादाको पोताही जलाता है."
एका मुलाखतीत अमिताभने या प्रसंगाचा संदर्भ देत सांगितले होते की, अत्याचारी माणसाला स्वतःच्या घराण्यातील माणसाकडूनच शह दिला जातो. हा काव्यात्म न्याय आहे.
काव्यात्म न्यायाची जी व्याख्या आहे, त्यात हा प्रसंग बसतो की नाही, कल्पना नाही.
व्याख्या एखाद्या ठिकाणी आढळल्यास देईन.