प्रत्येक सजीवामध्ये चैतन्य असते,  ते आपल्याला जाणवते. त्यामुळेच उपनिषदांमध्ये आत्म्याच्या विचाराची सुरुवात " जिवंत मनुष्य आणि मृतदेह यांत  फरक काय? "  या प्रश्नातून होते.  शरीराच्या मृत्यूने चैतन्य मृत होत नाही, असे उपनिषदांमध्ये म्हटले आहे. विज्ञानवादी मनुष्याला ते एखादेवेळी पटणार नाही, कारण त्याला अजून पुरावा मिळालेला नाही. पण अजून विज्ञानानेही त्याचे पटणारे उत्तर दिले नाही.

विज्ञानवादी म्हणतात की एखाद्या उपकरणाचा विद्युतपुरवठा बंद झाला की ते बंद पडते तसा शरीराचा मृत्यू होतो. तेच उदाहरण पुढे चालवले तर विद्युतपुरवठा म्हणजेच चैतन्य असे म्हणता येईल. या विद्युतपुरवठ्याचा स्रोत कुठे आहे, त्याचे स्वरूप कसे आहे या प्रश्नांची उत्तरे आज विज्ञानाकडे नाहीत. जसेजसे मनुष्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे विज्ञान देते तसेतसे ते प्रश्न धर्म/ अध्यात्म यामधून वगळले जाऊन विज्ञानात समानिष्ट होतात.  उद्या विज्ञानाने या प्रश्नांची उत्तरे दिली तर हे प्रश्नही धर्म/ अध्यात्माचा कक्षेबाहेर जाऊन विज्ञानात समाविष्ट होतील. पण तोपर्यंत अध्यात्माने जे उत्तर दिले आहे त्यावर विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य विज्ञानवाद्यांनी इतरांना द्यायला हवे.

लेखातले विचार बरेच विस्कळीत आहेत हे खरे असले तरी उपनिषदांमधले विचार बरेच तर्कशुद्ध आहेत. अर्थात तर्कशुद्ध आहेत म्हणून खरे असतीलच असे नाही. स्थिर विश्वाची कल्पना तर्कशुद्ध होती आणि प्रसरण पावणाऱ्या विश्वाची अतार्किक (काउंटर इंट्युटिव? ). तरीही आज प्रसरणशील विश्वाची कल्पना जवळपास सर्वमान्य झाली आहे (नारळीकरांचा अपवाद ).

विनायक