वरील लेखात लेखनाच्या ७-८ चुका आहेत, त्या अशा :
१. बीटाचा नको- बीटचा किंवा बिटाचा पाहिजे.
२. बीट हा शब्द पुल्लिंगी आहे.. मध्यम आकाराचा बीट असे हवे, आकाराचे नाही! किसून घ्यावे नाही, तर घ्यावा.(बीटचे अनेकवचन होत नाही. )
३. पाउण वाटी चूक, पाऊण हवी.
४. तुप ?; दूध, तूप, गूळ ह्या शब्दांतल्या पहिल्या अक्षराचा ईकार दीर्घ असतो.
५. पुड, चिमूट ? मराठी शब्दांतला उपान्त्य अक्षरातला ईकार-ऊकार दीर्घ असतो. पूड आणि चिमूट हे योग्य लिखाण.
६. वेलदोडा पावडर की वेलदोड्याची पूड? पूड, कूट, पावडर हे भिन्न अर्थाचे शब्द आहेत.
७. 'ऐछीक'ऐवजी ऐच्छिक पाहिजे होते.
८. '२ मध्यम आकाराचे बीट' असे लिहिणे उचित नाही. बीटचे मध्यम आकाराचे २ कंद हे योग्य लिखाण
मनोगताचा शुद्धिचिकित्सक झोपला होता?