>ज्यावेळी माणूस मरतो. तेव्हा त्याच्या कर्मांचे भोग कोणी भोगायचे तर त्याच्यावर अवलंबून असलेली संबंधित माणसे भोगतात.
= नाही. सर्व स्मृती मेंदूत असतात आणि तो मृत्यू नंतर (दहनादी क्रियांनी) डिफॉर्मॅट होतो, तस्मात एकाची कर्म दुसऱ्याला भोगायला लागत नाहीत.
>कारण अशी कर्म जर पुढे भोगण्यासाठी साचत गेली तर आत्म्याची प्रगती कशी होणार ? कारण तो नवनवीन अनुभवांसाठी नव्या नव्या परिस्थितीत जन्म घेत असावा
आत्मा सदैव निराकार आहे, आणि त्यामुळे जन्म-मृत्यूनं अनाबाधित आहे.
>मृतात्म्याचे जे कर्म भोग त्याला बरोबर नेता येत नाहीत . ते आजूबाजूचा समाज भोगतो....असे फिरणारे बेवारशी विचार त्या त्या विचाराकडे ओढले जात असावेत.
= पहिल्या चुकीमुळे पुन्हा, तदाधारित पुढचं सगळंच चूक!
>चांगले विचार , शुभ बोलणं (म्हणजे आताच्या पटणाऱ्या भाषेत पॉझिटिव्ह) वाईट
संगती पासून दूर राहणं हे आपल्या कर्माची प्रत सुधारण्यासाठी आणी* समाज
सुधारण्यासाठी आवश्यक आहे.
= हे एकल विधान म्हणून बरोबर आहे आणि ती उघड वस्तुस्थिती आहे. विचार म्हणजे आत केलेलं कर्म आणि कर्म म्हणजे व्यक्त झालेला विचार.
>थोडक्यात काय तर जे केलं ते याच जन्मात स्वतः आणि समाजाला भोगावे लागते.
= हा मुद्दा बरोबर असल्यानं सुरुवातीचा मुद्दा चूक ठरतो.
>याच विचारांनी पाहायचे झाले तर जे संत व जीवन मुक्त पुरूष आहेत त्यांच्या कर्मांचा वारसा पण .... त्यांच्या
संपर्कात येणारे वाईट लोक भोगतात.
= कुणाच्या कोणत्याही कर्माचा वारसा उरत नाही त्यामुळे तो भोगण्याचा प्रश्न येत नाही.
>...तरी यावर आपले काय म्हणणे आहे ते लिहावे ही विनंती.
= फुल म्हणणे वरती लिहीले आहे.