ह्या चित्रपटाची श्रेयनामावली मराठी/देवनागरीत आहे की इंग्रजी/रोमनमध्ये? की दोन्हीत?
दोन्हींत असेल तर दोन्ही लिप्यांच्या आकारमानात सारखेपणा आहे की फरक आहे?
आकारमानांत फरक असेल तर कोठली लिपी मोठ्या आकारमानात आहे?

चित्रपटाच्या मित्तिपत्रकात 'अस्तु' एवढा एक शब्द सोडला तर इतर काहीही देवनागरी मजकूर दिसत नाही?.
आंतरजालावर 'अस्तु' असा शोध घेतल्यावरही असे भित्तीपत्रक कोठे मिळाले नाही. चू. भू. द्या. घ्या.

हे सर्व जाणीवपूर्वक, योजनाबद्ध रीतीने केलेले आहे, की अनवधानाने झालेले आहे?

कुणाला माहीत असेल तर कृपया खुलासा करावा.