ह्या चित्रपटाची श्रेयनामावली मराठी/देवनागरीत आहे की इंग्रजी/रोमनमध्ये? की दोन्हीत?
दोन्हींत असेल तर दोन्ही लिप्यांच्या आकारमानात सारखेपणा आहे की फरक आहे?
आकारमानांत फरक असेल तर कोठली लिपी मोठ्या आकारमानात आहे?
गाजलेल्या चित्रपटांची श्रेयनामावली बनवतानाही दिग्दर्शक विशेष कष्ट घेतात असे ऐकलेले आहे. दिग्दर्शकाने असे घेतलेले कष्ट प्रेक्षकांच्या नजरेतून लपूही शकत नाहीत, असेही पाहण्यात आहे. त्यावरून वरील प्रश्नाचा रोख आहे.
चित्रपटाच्या मित्तिपत्रकात 'अस्तू' एवढा एक शब्द सोडला तर इतर काहीही देवनागरी मजकूर दिसत नाही?.आंतरजालावर 'अस्तु' असा शोध घेतल्यावरही असे भित्तीपत्रक कोठे मिळाले नाही. चू. भू. द्या. घ्या.