मूळ लेख शु चि शी ताडून पाहिला, परंतु सुचवण्या/सुधारणा आढळल्या नाहीत.
'गढूळले'. शब्दही शु चि ने 'गढुळले' असा दाखवला नाही. शु चि चे काम व्यवस्थित चालू आहे का? असेल तर ही सुचवणी दाखवायला हवी होती ना?
हे कळले नाही. प्रशासनाने वरील लेखाचे शुद्धलेखन शुद्धिचिकित्सक वापरूनच सुधारलेले आहे. वरील लेखात 'गढुळले' हा शब्द सुधारून बदललेल्या अवस्थेतच दिसत आहे. तुमचा मूळ लेख पाठसाठ्यात सापडणे शक्य आहे. हवा तर तो उघडून त्याची तपासणी करून त्यात चुकीचे वाटलेले शब्द दाखवता येणे (वेळेच्या उपलब्धतेनुसार) शक्य आहे.