खात, खातरा, खातेरे, खातवड इ. शब्द ह्या पानावर वाचल्यावर 'घाणीचा, मातीचा, कचऱ्याचा किंवा खताचा (गावाबाहेरचा? ) छोटा मोठा ढिगारा' असा अर्थ खात/खातरा - खातरूड (मिशी-मिसरूड प्रमाणे) ह्यावरून काढावासा वाटला. त्यावरून खातरूड चे इंग्रजीत कॉथ्रूड असे आणि त्यातून ते कोथरूड असे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात हा सगळा माझा कल्पनाविलास आहे.