मूळ लेख हा चित्रपट विषयक आहे आणि लेखिकेचा उद्देश एका आवडलेल्या चित्रपटाची ओळख करून देण्याचा आहे. 

त्यामुळे वरील सर्व प्रतिक्रिया पाहून थोडे आश्चर्य वाटले, आणि थोडा खेदही वाटला. एकाही प्रतिक्रियेत  चित्रपट किंवा वरील समीक्षेचा उल्लेखही नाही, किंवा त्यासंबंधी मत प्रदर्शन नाही, तर फक्त शुद्धलेखन, लिपी इत्यादींचाच काथ्याकूट आहे. चित्रपट किंवा समीक्षा आवडली नाही असे असेल तरी ठीक आहे, पण मुद्द्याचा विषय बाजूला ठेवून बाजूबाजूच्या तपशीलावरच जास्त लक्ष केंद्रित होते आहे असे वाटते. शुद्ध मराठी महत्त्वाचे असेलच, परंतु, अतिशय शुद्ध आणि *अत्यंत मराठी* , पण रटाळ अशा लिखाणापेक्षा थोडेसे अशुद्ध /  थोडेसे अ-मराठी,  पण मनोरंजक, रसाळ लेखन जास्त  स्वागतार्ह आहे, नाही का? निदान असायला तरी हवे, माझ्या मते !! शेवटी नुसत्याच नीटनेटक्या, शिस्तबद्ध  'पॅकेजिंग' पेक्षा, कंटेण्ट ला थोडे तरी जास्त महत्त्व द्यायला हवे. 

शिवाय अशा प्रतिक्रियांनंतर लेखक/लेखिकेला पुन्हा काही लिखाण सुपूर्द करण्याचा उसाह कितपत उरेल किंवा उरेलच का, याचाही विचार व्हायला हवा असे वाटते. कदाचित अशामुळेच 'मराठी मानसिकता' असा एक शब्दप्रयोग, मराठी लोकांमध्येच फार रूढ  आहे.