चित्रपटाच्या नावाचा अर्थ .....
ह्यावरून एक आठवण झाली. इ. स. ७४-७५ साली 'एंटर द ड्रॅगन' नावाचा एक इंग्रजी चित्रपट पुण्यामुंबईत प्रदर्शित झालेला होता. तो फक्त प्रौढांसाठी होता आणि मी त्यावेळेला प्रौढवयात नव्हतो, त्यामुळे मी तो पाहिला नाही. (अद्याप पाहिलेला नाही. ) मात्र माझ्या अनेक समवयस्क मित्रांनी तो (कसा काय कोण जाणे पण) पाहिला. ... असो. तर त्या चित्रपटाच्या नावाचा अर्थ मला काही केल्या कळला नव्हता. ... (ड्रॅगनमध्ये शीर, प्रवेश कर- किंवा ड्रॅगनमध्ये शिरा, प्रवेश करा ... हे अगदीच निरर्थक वाटायचे.) चित्रपट आवडला म्हणून सांगणाऱ्या जवळ जवळ ऐशी-नव्वद टक्के लोकांना मी अर्थ विचारून पाहिला. त्यावर त्यांनी चित्रपट समजण्यासाठी नावाचा अर्थ समजला नाही तरी चालतो असे सांगितले. (अर्थ मात्र कुणी सांगितला नाही. ) अर्थात मला तो चित्रपट पाहण्यात काही स्वारस्य नव्हते म्हणून मी पुढे त्याचा पाठपुरावा केला नाही.
पुढे आय आय टीत 'एंटर अ फ्री मॅन' नावाचे नाटक विद्यार्थ्यांनी बसवलेले होते ते वाचल्यावर-पाहिल्यावर त्या वाक्यरचनेचा संदर्भ लक्षात आला.