धन्यवाद  संजोपजी ! पण जानवे एकदा तरी घालणारी आपली शेवटची पिढी वगैरे खरे नाही कारण हौशीला मोल आणि अंत नाही.  पगडी घालणारी आपली शेवटचीच पिढी असे लोकमान्य टिळकांना वाटले असेल पण  अनेक लग्नात पगडी घालणारे पुरुष व नऊ वारी धारण  करणाऱ्या स्त्रिया  यांची संख्या वाढत आहे. माझ्या पुतणीच्या लग्नात  श्रीमंतपूजनाच्या वेळी वराला त्याच्या ज्येष्ठ भावोजीनी अगदी ऐन वेळी फेटा  बांधून  घेण्यासाठी   त्याच्या मनात नसताना पिटाळला आणि तासभर सर्व मंडळींना हातावर हात धरून बसायला लागले.  तेव्हां मुंजीची हौस पुढील पिढ्यातही लोक भागवणार आणि एकदा तरी जानवे घालणाऱ्या बऱ्याच पिढ्या निघणार  यात शंका नाही.