हा लेख मला फारसा विनोदी वाटला नाही. पण जानवं घालणं आणि त्याची महती या वर विचार व्हावा ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे असं वाटत नाही. आपण पुरोहित असाल किंवा आपल्याला जुन्या सर्व धार्मिक विधींमध्ये फार रस असेल तर मात्र "यज्ञोपवीतं 
परम पवित्रं ... " हे मानावंच लागेल . प्रत्येक कर्माच्या पूर्ततेच्या काही अटी असतात, मग तो वैज्ञानिक प्रयोग असो वा  एखादा धार्मिक विधी असो, 
त्या पुऱ्या झाल्याशिवाय अपेक्षित परिणाम साधत नाही. भलेही तो परिणाम काल्पनिक किंवा भावनिक असो. हा लेख अधिक विनोदी केला असता तरी चाललं असतं. तसंही कितीक नाजुक प्रथांबद्दल विनोदी लेखन केले तरी हरकत नसते असे वाटते.