अशी व्यर्थ अपेक्षा ठेवल्यामुळे चित्रपटात नक्की काय सांगायचंय असा गोंधळ उडतो.
'अस्तू' (हे इथे आपोआप दीर्घ केलं जातंय, त्यामुळे जे काय असेल ते ), ही एक आध्यात्मिक प्रणाली आहे. तिचा रूढार्थ 'जे आहे त्याचा स्वीकार' असा होतो. आता कुणी काय स्वीकारावं अशी दिग्दर्शकाची अपेक्षा आहे? म्हणजे नायकानं 'स्मृतिभ्रंश स्वीकारायचा' का स्मृतिभ्रंश झालेला नायक' घरच्यांनी स्वीकारायचा' (की चित्रपट आहे तसा आपण स्वीकारायचा? ) असा सार्वत्रिक गोंधळ आहे.
नायकानं स्मृतिभ्रंश स्वीकारणं अशक्य आहे कारण त्याची बौद्धिक क्षमताच संपलेली आहे. घरच्यांनी अल्झायमरचा पेशंट स्वीकारायचा असा खुल्ला अर्थ दाखवला तर चित्रपट स्पर्धेत नापास होईल. तस्मात, अस्तू असं नामकरण करून फक्त एक भेळ लोकांना चर्चेला दिली आहे. आणि कथाविषयाशीच बेइमानी केल्यानं (किंवा संदिग्धता ठेवल्यानं) चित्रपट व्यर्थ झाला आहे.
असो, या निमित्तानं, अस्तू म्हणजे आत्यंतिक अर्थानं, जे आहे त्याच्या स्वीकारापेक्षा, जे आहे त्याच्याशी 'समरूपता' असा आहे. आणि तो अर्थ दिग्दर्शकानं किंवा आगाश्यांनी (पोस्टरमध्ये लिहिला असला तरी), त्यांनी तो समजला असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण ती एक आध्यात्मिक प्रणाली आहे. साधकानं जे आहे त्याच्याशी आत्यंतिक तादात्म्य साधलं, तर त्याची जाणीव आकाराकडून निराकाराकडे जाते. थोडक्यात, तो अर्थ समजला असता तर चित्रपटाला अस्तू नांव देण्याचं साहस झालं नसतं.
चर्चा वाचताना रसिकांनी (नेहमी प्रमाणे) केलेल्या शब्दच्छलाची आणि विषयाला फाटा मारण्याची हातोटी जारी ठेवली याचं कौतुक वाटलं. यामुळेच शुद्धिचिकत्सकाची सोय असलेलं एकमेव संकेतस्थळ, सदस्यत्व घेऊन केवळ शुद्धलेखन तपासण्यासाठी वापरतात आणि लेख दुसऱ्या संकेतस्थळावर प्रकाशित करतात या माहितीची खात्री पटली.
(संपादित)