मराठीप्रेमीने म्हटल्याप्रमाणे सिनेमावाल्यांनी आपल्याला काय दाखवावे हे आपल्या हातात नाही. पण ते पाहावे की नाही हे मात्र आपल्या हातात आहे. माझ्या मते अशा प्रकारच्या कौटुंबीक दुष्टचक्र दाखविलेल्या मालिकां/सिनेमांमुळे चुकीची 'ब्रेन प्रोग्राम्मिंग' होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अशा मालिका पाहणे टाळावे. माझ्या मताच्या समर्थनार्थ मी सर्वांना डॉ. रमा मराठे यांचे 'ब्रेन प्रोग्राम्मिंग' हे पुस्तक वाचण्याचा सल्ला देईन.