बंगालीमध्ये व आणि ब ही दोन्ही अक्षरे मुळाक्षरांच्या यादीत योग्य त्या जागी स्थिरावलेली दिसतात, मात्र दोन्ही अक्षरांचे लिखाण आणि उच्चार एकसारखेच होतात.  हिंदीत अनेकदा 'व'चा 'ब' होतो, पण तरी दोन्ही अक्षरांचे स्वतंत्र उच्चार होतातही.  मराठीला ही लागण अद्यापपावेतो झाली नव्हती.  परंतु मराठी वृत्तपत्र दैनिक सकाळचा आजचा (७ ऑगस्ट २०१४चा) ई-पेपर उघडला, आणि मराठीतही वबयोरभेदः या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले.  पेपरात प्रत्येक 'ब'च्या जागी आवर्जून 'व' छापला आहे.

मराठीतील अक्षरसंख्या घटविण्याची ही सुरुवात तर नाहीना !