व आणि ब यात फरक न केल्याने काय गजहब होऊ शकतो ते नुकतेच एका टीवी वाहिनीवर पाहायला मिळाले. प्रीती झिंटा या सिने तारीकेने नेस वाडिया या उद्योगपती वर शारीरिक छळ केल्याची तक्रार केली आहे हे वाचकांच्या स्मरणात असेलच. तर प्रीती झिंटा हिने पोलिसां समक्ष काही स्टेटमेंट दिले ज्याने नेस अडचणीत येण्याची शक्यता होती. एका वाहिनी वर "टिकर टेप" - म्हणजे स्क्रीनच्या अगदी खाली एका लाइनीत ठळक बातम्या टेक्स्ट मध्ये दाखवत असतात ते, त्यावर वारंवार बातमी दाखवत होते : "प्रीती झिंटाच्या जवानीने नेस वाडिया अडचणीत. " वाचून मी आश्चर्यात पडलो. जरा वेळाने लक्षात आले कि त्यांना "जवानीने" म्हणायचे नसून "जबानीने" म्हणायचे होते