प्रीती झिंटा बंगाली असती तर तिने बॉडिया केले असते.  ते जवानीशी आणखी जुळले असते.

मराठीमध्ये 'ह' असलेले शब्द नेहमीच गहजब करतात.  मशहूरचे मराठीत महशूर झालेले दिसते, तसेच गहजबचे गजहब.

आधीच्या अक्षराची मात्रा 'ह'ला जोडून बरेच मराठी शब्द बनतात.  उदा० पाहणे-पहाणे; चाहणे-चहाणे/चहाता; पोहणे-पोहोणे/पोह; तोहमत-तोहोमत; पोहचणे-पोहोचणे/पोचणे; बोहरी-बोहोरी/बोहारीण (मुळात हा शब्द व्होरा असा आहे.  मुसलमानी व्होरांच्या स्त्रिया ठळकपणे नजरेला पडत असल्याने मराठीने आख्ख्या जमातीलाच स्त्रीलिंगी केले)., वगैरे.