अमिबा,
पिंगल आणि फिबोनाची श्रेणी यांचा संबंध मला आणि वर ज्यांनी प्रतिसाद दिले आहेत त्यापैकी तुम्ही सोडून इतर कुणालाही माहीत नसावा असे दिसते. तरी तुम्हीच पिंगल यांच्या गणितातील कामगिरीबद्दल सविस्तर माहिती द्या न. सर्वांनाच त्याचा उपयोग होईल. स्वतंत्र लेखाच्या रूपात ही माहिती दिलीत तर जास्तच चांगले.
भारतात प्राचीन काळापासून झालेल्या थोर शास्त्रज्ञांबाबतचे अज्ञान पाहून खूप वैशम्य वाटते...
वैशम्य (वैषम्य) याचा इंग्रजी अर्थ jealousy असा आहे असे मला वाटते. तुम्हाला बहुधा विषण्णता म्हणायचे असेल. विषण्णता येणे साहजिक आहे. म्हणूनच तुमच्यासारख्यांनी हे ज्ञान इतरांनाही द्यावे.
मीरा