भाषा रीवाईज करणारच असाल तर आमूलाग्र  बदल करून एक नवीन भाषा तयार करावी. त्याचे ढोबळ स्वरूप खाली देत आहे.
अ प फ ब भ म त ठ द ध न ट ठ ड ढ ण क ख ग घ य र ल व स श ह ळ ज झ ज झ  अशी एकूण ३० मुळाक्षरे (ष वगैरे कनफ्यूज करणारी अक्षरे मुद्दामूनच वगळली आहेत) व प्रत्येक मुळाक्षराचे प पा पे पै पि पी पो पौ पु पू  असे दहा आकार-उकार मिळून एकून ३०० "ध्वनी" होतात. या ध्वनी संग्रहातून  दोन "ध्वनींचे" शब्द केले तर ३०० सी २ म्हणजे ३०० वस्तुंची Combinations  टेकन २ at  ए टाईम
 = फॅक्टोरियल (३००) / [फॅक्टोरियल(३००-२) X फॅक्टोरियल(२)]
= ३००*२९९*फॅक्टोरियल (२९८) / [फॅक्टोरियल(२९८ ) X फॅक्टोरियल(२)]
= ३००*२९९/२ = ४४,८५० येवढे शब्द तयार होतात. यात प्रत्येक शब्द दोनच अक्षरांचा असेल, कुठलाही शब्द दोन पेक्षा जास्त अक्षरांचा असणार नाही, कुठेही जोडाक्षर असणार नाही, म्हणून लहान मुलांना शिकायला सोपी असेल. कोणत्याही शब्दात अक्षर संख्या फक्त दोनच असल्याने गहजब चा गजहब केल्याचा गहजब होणार नाही.

वैज्ञानिक पद्धतीने शब्दांना अर्थ दिल्यास भाषा शिकायला आणखीन सोपी होईल. जसे, सर्व खाण्याच्या पदार्थांची नांवे "ख" या अक्षरापासून जसे खाक, खापा, खणी, खडू, खलै, खघू, . . . .  वगैरे.  सर्व क्रियापदे "क" पासून. इत्यादी.   ही भाषा ऐकायला साधारण अशी असेल
मुदा कितु बडे पीपी कता झिवू लबै अको वर बिली शिम शिमा गिगी जमू . . . . वगैरे. बोलताना छान तालात लयीत, बोलता येईल. वरील वाक्य कहरवा या तालात वाचून बघा.
 
४४,८५० ही शब्द संख्या बहुतेक मराठीत सध्या असलेल्या शब्दांपेक्षा जास्त आहे. व नसली तरी ४४,८५० एवढे शब्द काहीही व्यक्त करायला पुरेसे असावेत. नाहीतरी मोठमोठे, अनेक अक्षरे असलेले, जोडाक्षरे असलेले वगैरे शब्द संग्रह पदरी बाळगून, अत्यंत किचकट असे व्याक्रण बांधून, पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसकलींग अशी तीन लिंगे असून,  आता पर्यंत साहित्यात प्रगती काय ? तर फक्त तीन ज्ञानपीठ व नोबेल एकपण नाही. तर या नव्या भाषे वर विचार व्हावा.