काय तरी बुवा आता बोला काय करा जस हव तस कस कस होत आहे मला तरी बर नाही सर सर पुढे मागे जिथे कुठे जसे जसे होते तसे झाले हसे रडू नका ढसा ढसा खर आहे खूप काही...
ता. क. - : 'फक्त' ३ ज्ञानपीठ आणि नोबेल एकही नाही म्हणून 'भाषां'-तर करण्याची कल्पना (गंमत म्हणून केली असली तरी) आवडली. भारतातील मूळ १४ अधिकृत भाषांपैकी (आता २२ आहेत) तामिळ, पंजाबी सकट ५ भाषांना ३ हून कमी ज्ञानपीठ आहेत, आणि मराठीशिवाय गुजरातीला ३. म्हणजे ७ भाषांना सध्या ३ हून अधिक तर ७ भाषांना ३ किंवा कमी. नोबेल तर बंगाली सोडून कशालाच नाही, त्यामुळे तोच निकष लावला तर मग भारतवर्षातील सर्वच भाषा निकालातच काढायला हव्यात. त्याशिवाय जगातील अंदाजे ६८००+ भाषांपैकी २५ भाषांनाच नोबेल मिळाली आहेत, त्यामुळे उर्वरित भाषा नष्ट काण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रमच तयार करायला हवा. ज्या भाषांत 'कसदार' (म्हणजे काय? ) साहित्य निर्माण होत नाही, त्या भाषा बिरबलाच्या गोष्टीतील १८ नक्षत्रांप्रमाणेच, नाही का?