'ब' चे 'व' करण्याचे काम टंकलेखकाने केले आहे, लेखकाने नाही.  आणि तेही  १९ जूननंतरच्या सकाळच्या ई-आवृत्तींपुरते. तेव्हा दृष्टिदोष असेलच तर तो टंकलेखकाचा, लेखकाचा नाही.  'ब'ची दांडी न दिसण्याइतकी अस्पष्ट नसते, या साईटवर तर ती नक्कीच नाही.  आणि संगणकावर अक्षर मोठे करून वाचायची मुभा असते.  गंमत अशी की त्या वृत्तपत्रातील जाहिरातींमधले 'ब' सलामत आहेत.