थोडासा गैरसमज झाला आहे. 'सदर लेखक' म्हणजे हा प्रतिसाद लिहिणारा, अर्थात मी स्वत: या अर्थाने लिहिले होते. तसेच व / ब संबंधीची प्रतिक्रिया त्यावरील पोस्ट संदर्भात टीव्ही स्क्रॉल बद्दल होती, इ-सकाळ बद्दल नाही. असो. 

वृत्तपत्रातील जाहिरातींमधले 'ब' सलामत असण्याचे कारण बहुधा असे असावे, की पेपर जुळवताना बातम्यांमध्ये टेक्स्टचा वापर केलेला असावा, तर जाहिरातींमध्ये चित्राचा (इमेज). आताच इ-सकाळ पाहीला असताना असेही लक्षात आले, की जाहिरातीं व्यतिरिक्त फोटोंखालील कॅप्शन्स मध्ये एवढेच नव्हे, तर बातम्यांच्या शिर्षकांमध्येदेखील ब टिकून आहे. 

तसेच, इ-सकाळमध्ये सातत्याने, दिवसे दिवस जर एकच चुक न चुकता होत असेल, तर ती मानवी चुक असण्यापेक्षा सॉफ्टवेअर प्रक्रियेतील चुक असण्याचीच दाट शक्यता आहे. चुकात देखील एवढे सातत्य राखणे मानवाला कठीणच आहे.