यावर बरेच चर्विचर्वण करता येईल. 

पण वाचकांचा (आणि लेखकाचा) वेळ  वाचवण्याकरिता, शक्य तेवढ्या थोडक्यात एवढेच म्हणावेसे वाटते, की मराठी काय किंवा अन्य कोणती भाषा काय, असं तर होत नाही की एकाने व्याकरण लिहील, दुसऱ्याने एक डिक्शनरी बनवली, आणि मग लोक, ते व्याकरणाचे नियम आणि  कोशातील शब्द वापरून ती भाषा बोलू लागले.  

म्हणजे, असे म्हणायचे आहे, की भाषा काही कोणी 'डिझाइन'  केली नाही, ती 'आपोआप' बनत गेली, उत्क्रांत होत गेली. आणि ती त्या त्या वेळी, ज्या स्वरूपात असते, त्या त्या वेळी ती त्या स्वरूपात वापरली जाते.  त्यामुळे मला असं वाटतं की भाषेच्या संदर्भात हे असं का, आणि ते तसं का नाही, या प्रश्नांना फारसा अर्थच उरत नाही. (या दृष्टीने भाषा ही अपौरुषेय आहे असंही म्हणता येईल.)

हा, असं वाचल्याच आठवतं की एखादी (किंवा एकाधिक) कृत्रीम - म्हणजे मानव 'निर्मित'  'सर्व-गुण-संपन्न' - म्हणजे 'सोपी', 'कार्यक्षम', 'परिणामकारक' वगैरे - भाषा निर्माण करावी हा विचार आधुनिक भाषाशास्त्राच्या काळात आधी मांडला गेलेला आहे, आणि त्या दृष्टीने प्रयत्नही झालेले असावेत. पण अजून तरी त्यात फारसे यश मिळालेले नसावे असे दिसते !!