छान पोस्ट. त्या काळातील 'मेलडियस' संगीताला साजेसे असे सुंदर, सोपे, सुटासुटीत शब्द वापरले आहेत. 

'गम की दुनी - यासे दिल - भर गया' अशी फोड ती ओळ ठेक्याप्रमाणेमाणे बसवण्यासाठी झाली आहे (असे वाटते). पण अशी फोड कधी कधी अर्थाचा अनर्थ करू शकते. आता उदाहरण आठवत नाही, पण अशी उदाहरणे नाट्यसंगीतात बऱ्याचदा आढळतात, विशेषतः शब्द तोडून तान घेतली जाते तेव्हा. 

आता हे गाणे ऐका. अर्थात हे संथ लयीत असल्यामुळे कंटिन्युइटी राखणे थोडे सोपे झाले असावे.