इसाप आणि महेश, धन्यवाद.
इसाप, तुम्ही म्हणता ते खरे आहे. लताचे गाणे धीम्या गतीचे असल्याने जाणवत नाही. तलतच्या गाण्यात जाणवते.
महेश
आता विचार केल्यावर अशी आणखी गाणी लक्षात यायला लागली.
उदा. आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे गंध तू मागू नको
- वा. रा. कांत, सुधीर फडके
जाता जाता - वरील ओळी फैज अहमद फैज यांच्या
"मुझसे पहली मुहब्बत मेरे मेहबूब ना मांग"
या प्रसिद्ध ओळीवरून बेतल्या असाव्यात असे वाटते.
भाषेचे जुजबी ज्ञान असणाऱ्यालाही गाणी गुणगुणायला सोपी जावीत हे खरेच आहे. त्याबरोबरच दोन अक्षरी /द्ववयवी शब्द वृत्त - लयीत बसवायला तुलनेने सोपे असावेत असा अंदाज आहे. दोन अक्षरी ऐवजी द्ववयवी योग्य आहे.
विनायक